शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रक्तरंजित फाळणीत ऐक्याचे दर्शन; आज मात्र धार्मिक तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:15 PM

औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला होता...

यदू जोशी

मलेरकोटला (पंजाब) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी संपूर्ण पंजाब रक्ताची होळी खेळत असताना अभूतपूर्व धार्मिक एकोप्याचे दर्शन घडविलेल्या मलेरकोटलामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा बोलबाला दिसत आहे. हिंदू-शीख-मुस्लीम ऐक्याचा इतिहास असलेला हा मतदारसंघ सध्या धार्मिकतेवर विभागल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 

औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला, त्यांना का मारले? मी केला असता त्यांचा सांभाळ अशी भावनिक वाक्ये त्या पत्रात होती. 

मलेरकोटलातील ज्येष्ठ पत्रकार सुमंत तलवानी यांच्या मते मुस्तफा यांची भाषा भावना भडकविणारी आहे, ते प्रशासनाला धमकी देताहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद रफी यांच्या मते मुस्तफा यांच्यावरील आरोप निराधार आहेत, ते तसे बोललेच नव्हते.

एकीचे दर्शन...फाळणीचे चटके बसलेली पिढी आजही आहे आणि तिने अनुभवलेल्या वेदना पुढच्या पिढीच्याही अंतर्मनात आहेतच. त्याला अपवाद आहे ते राजधानी चंडीगडपासून ९० किलोमीटरवर असलेले मलेरकोटला. बहुतेक ठिकाणचे मुस्लीम पाकिस्तानात गेले; पण हिंदू-शिखांनी त्यावेळी या ठिकाणच्या मुस्लिमांना पाकिस्तानात जाऊ दिले नाही. उलट त्यांच्यावर कोणी बाहेरून येऊन हल्ला करू नये यासाठी संरक्षक भिंत उभारली. ती मुुस्लिमांच्या एका राजाने शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांच्याप्रती दाखविलेल्या श्रद्धेची परतफेड होती. 

माजी डीजीपींचे ते विधान अन् पत्नी रझियांची अडचणया छोटेखानी शहरात निवडणूक धार्मिक वळणावर जाण्यासाठी कारणीभूत ठरले आहे ते पंजाबच्या सामाजिक सुरक्षा तसेच महिला व बालकल्याण मंत्री रझिया सुलताना यांचे पती मोहम्मद मुस्तफा यांचे कथित विधान. मुस्तफा हे राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत. त्यांना चार शौर्यपदके मिळालेली आहेत. रझिया काँग्रेसच्या तीन वेळा आमदार असून विद्यमान उमेदवारदेखील आहेत.  मुस्तफा हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मानले जातात. अगदी अलीकडे मुस्तफा यांनी ‘मै हिंदुओं को मारूँगा’ असे विधान केल्याचा आरोप आहे. मात्र, ‘मैं फितनों को मारूँगा’ असे विधान मी केले होते, हिंदूंबाबत बोललोच नव्हतो, असा मुस्तफा यांचा दावा आहे.  माझा लढा माझ्या कौमसाठी आहे, माझ्यापेक्षा मोठा जलसा कोणी घेतला तर मी प्रशासनाला सांभाळता येणार नाही, अशी परिस्थिती मी निर्माण करीन असे ते म्हणाले होते.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकHinduहिंदूMuslimमुस्लीम