नवी दिल्ली - केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश असलेल्या ११९ औषधांचे कमाल दर निश्चित केल्याने या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता येत्या काळात आणखी काही औषधांचा समावेश हा एनएलईएममध्ये करून त्यांच्या कमाल किमती निश्चित करण्याचा केंद्राचा विचार आहे. दरम्यान, ताप आल्यावर दिल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलचे दरही १२ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीच्या बैठकीमध्ये या यादीत समावेश असलेल्या ११९ प्रकारच्या फॉर्म्युलेशनवाल्या औषधांची कमाल किंमत प्रति टॅबलेट आणि कॅप्सुलबाबत निश्चित करण्यात आली आहे. ज्या मुख्य औषधांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तापावरील औषध पॅरासिटामॉल आणि मलेरियामधील औषधांमध्ये उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन यांचा समावेश आहे.
औषधांची जुनी किंमत आणि नवे दर पुढीलप्रमाणे टेमोझोलोमाइड - आताची किंमत ६६२.२४ रुपये, नवी किंमत ३९३.६एलोप्युरिनॉल - आताची किंमत ८.१ रुपये, नवी किंमत ५.०२ रुपयेसोफोसबुवीर - आताची किंमत ७४१.१२ रुपये, नवी किंमत ४६८.३२ रुपये लेट्रोझोल - आताची किंमत ३९.०३, नवी किंमत २६.१५ रुपये क्लेरिथोरोमाइसिन - आताची किंमत ५४.८ रुपये, नवी किंमत ३४.६१ रुपये हेपरिन - आताची किंमत २४.३९ रुपये, नवी किंमत १८.९२ रुपयेफ्लुकोनाझोल - आताची किंमत ३४.६९ रुपये, नवी किंमत २६.५३ रुपयेमेटफोर्मिन - आताची किंमत ४ रुपये, नवी किंमत ३.११ रुपयेसोफिक्सिम - आताची किंमत २४.५ रुपये, नवी किंमत १९.७१ रुपयेपॅरासिटामोल - आताची किंमत २.०४ रुपये, नवी किंमत १.७८ रुपयेहायड्रोक्सिक्लोरोक्विन - आताची किंमत १३.२६ रुपये, नवी किंमत १२.३१