शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

नवीन पटनाईक यांना झटका, भाजपने हिसकाविली विक्रमाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 7:59 AM

भाजपने बहुमताकडे मिळविल्यामुळे नवीन पटनाईक यांना सत्तास्थापनेचा विक्रम करता आला नाही.

भुवनेश्वर : ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी बीजेडीला पराभवाचा झटका दिला आहे. राज्यातील १४७ विधानसभा जागांपैकी ३३ जागांवर विजय मिळवला, तर ४५ जागांवर आघाडी घेतली असून एकूण ७८ जागांच्या आघाडीसह सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे बिजू जनता दलाने २५ जागांवर विजय मिळवला असून २६ मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसने ५ जागा जिंकल्या, तर ९ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने बहुमताकडे मिळविल्यामुळे नवीन पटनाईक यांना सत्तास्थापनेचा विक्रम करता आला नाही.

मुख्यमंत्री पटनायक पिछाडीवरमुख्यमंत्री आणि बीजेडीचे सुप्रीमो नवीन पटनायक यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते बोलंगीर जिल्ह्यातील कांताबंजी विधानसभा जागेवर भाजपच्या लक्ष्मण बग यांच्यापेक्षा १२,१६४ मतांनी पिछाडीवर होते, परंतु गंजम जिल्ह्यातील हिंजिली जागेवर त्यांचे भाजप प्रतिस्पर्धी शिशीर कुमार मिश्रा यांच्यापेक्षा ४,५९१ मतांनी ते आघाडीवर होते. 

आठ मंत्री पिछाडीवरओडिशा विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील किमान आठ मंत्री पिछाडीवर आहेत. वन आणि पर्यावरण मंत्री प्रदीप कुमार आमत, बांधकाम मंत्री प्रफुल्ल कुमार मल्लिक, उच्च शिक्षण मंत्री अतनु सब्यसाची नायक, परिवहन मंत्री तुकुनी साहू, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशोक चंद्र पांडा, वित्त मंत्री बिक्रम केशरी अरुखा, हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री रिता साहू आणि महिला आणि बाल विकास मंत्री बसंती हेमब्रम पिछाडीवर आहेत.  

आंध्रात एनडीएची विजयी घोडदौडअमरावती : तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि त्याचे भागीदार जनसेना, भाजप युतीने आंध्र प्रदेशमध्ये मुसंडी मारली आहे. युतीने १६५ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली असून, ७० विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवला आहे. राज्यातून सत्ताधारी वायएसआरसीपीचा दणदणीत पराभव झाला आहे.टीडीपीने ५७, जनसेनेने ९, भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत, तर वायएसआरसीपीने ३ जागांवर विजय मिळविला असून एकूण १० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, एक मंत्री वगळता मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य पिछाडीवर आहेत. राज्यातील सत्ताधारी वायएसआरसीपीला आव्हान देण्यासाठी टीडीपी, भाजप आणि जनसेना यांनी एनडीए युतीची स्थापना केली होती.

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपा