शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शेकोटी पेटवली अन् ६ जणांचा श्वास थांबला, दिल्लीतील मृतांत एकाच कुटुंबातील चौघे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 7:20 AM

दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरेतील पाच राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप चांगलाच वाढला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दिल्लीत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.

दिल्लीच्या अलीपूर परिसरातील एका घरातील चार व्यक्ती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळाची पाहणी केली असता घरात शेकोटी पेटविल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. राकेश (वय ४०), पत्नी (ललिता (३८), पीयूष (८) व सनी (७) अशी मृतांचे नाव आहे. अशीच घटना पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरी भागात घडली. तिथेही शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून दोन नेपाळी व्यक्तींचा मृत्यू झाला. रामबहादूर (५७) व अभिषेक (२२) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान श्रीनगरमध्ये पारा उणे ४.२ वर गेला आहे.

टॅग्स :weatherहवामान