नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात काही महत्त्वाच्या संसदीय प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीच्या मंत्रिमंडळासमोरील अजेंड्याबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आले नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांवरील विधेयक मंजूर करण्यासाठी या अधिवेशनात सरकार सादर करण्याची शक्यता नाही, असे सुत्रांनी सांगितले. अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) आणि निवडणूक आयुक्तांच्या (ईसी) नियुक्तीबाबतचे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार सादर करण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. या विधेयकातील तरतुदींवर टीका झाल्यानंतर हे विधेयक सादर होणार नसल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. हे विधेयक कायदा आणि न्यायविषयक स्थायी समितीकडे पाठवावे, असाही सरकारमध्ये एक मतप्रवाह आहे.
पंतप्रधान माेदींना पत्रएन. गोपालस्वामी, व्ही. एस. संपत आणि एस. वाय. कुरैशी यांच्यासह काही माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी शनिवारी पंतप्रधानांना पत्र लिहून सीईसी आणि ईसींना मंत्रिमंडळ सचिवांच्या बरोबरीने ठेवण्याच्या तरतुदीला विरोध केला होता.