मुरैन - मध्य प्रदेशातील मुरैन जिल्ह्यातील एक वाहतूक पोलीस हवालदारास मारहाण केल्यामुळे येथील जवळपास एक डझन आरोपींवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. हवालदाराला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. जिल्ह्यातील बागचिनी पोलीस ठाण्याच्या घुर्रा गावात पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने आले होते. येथील आरोपींच्या घरावर या अधिकाऱ्यांच्या आदेशाने बुलडोझर चालविण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी बरियल चौकात ड्युटी करत असलेले वाहतूक पोलीस हवालदारने कंटेनरला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कंटेनर थांबवला नाही, त्यावेळी, हवालदाराने चालकाला पकडण्यासाठी कंटेनरच्या खिडकीतून धडक मारली. तरीही चालकाने गाडी न थांबवल्याने कंटेनरच्या खिडकीसोबत लटकून एक किलोमीटरपर्यंत पुढे गेला. दरम्यान, यावेळी एका दुचाकी चालकाने आपली गाडी समोर लावून कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र, हवालदाराने कंटेनर अडवल्यामुळे कंटेनरमधील लोकांनी हवालदारास मारहाण केली.
कंटेनरमधील प्रवाशांकडून होत असलेली मारहाण ट्रॅफीक डीएसपींच्या समोरच होत होती. पण, त्यांनी समोर येण्याऐवजी तेथून पळ काढला. यावेळी, पोलिसांनी आरोपी कंटेनर चालकास अटक केली. मात्र, हवालदारास मारहाण करणारे तेथून पळून गेले. त्यामुळे, या घटनेतील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवून पोलीस प्रशासनाने अशी सक्तीची कारवाई केली