नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीसवर समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. भाजप नेत्याच्या या कृत्यामुळे पक्षाची बदनामी होत असतानाच भाजपने शहर सरचिटणीस यांची पक्षातून हकालपट्टी करून याप्रकरणी कठोर कारवाई केली. त्याचवेळी समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
खरं तर भाजप नेता 47 वर्षीय असून सपा नेत्याची मुलगी 26 वर्षांची आहे. याशिवाय भाजप नेता 2 मुलांचा बाप देखील आहे. सपा नेत्याची मुलगी आणि भाजप नेत्याचे प्रेमसंबंध मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. मुलीचे लग्न ठरल्यावर दोघेही पळून गेले. भाजप नेते आशिष शुक्ला विवाहित असून त्यांना 21 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? समाजवादी पार्टीच्या नेत्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, 47 वर्षीय भाजपचे शहर सरचिटणीस आशिष शुक्ला उर्फ राजू शुक्ला हे त्यांच्या शेजारी राहतात. 13 जानेवारी रोजी आशिषने आपल्या 26 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. भाजप नेते आशिष हे दोन मुलांचे वडील आहेत. दुसरीकडे, सपा नेत्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी फरार भाजप नेते आशिष आणि सपा नेते यांच्या मुलीचा शोध सुरू केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"