शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 5:01 PM

लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता ICMR एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल

नवी दिल्ली - २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरात पाहायला मिळाला. त्यानंतर हळूहळू या व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला. २०२० मध्ये भारतातील परिस्थिती पाहून लॉकडाऊन लावावे लागले. त्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी लस बनवण्यात आली. अनेक देशांनी लसी विकसित केल्या. भारतानेही २ कोरोना लसी बनवल्या. २०२१ मध्ये भारतात लोकांचे कोविड लसीकरण होण्यास सुरुवात झाली. त्याचसोबत गेल्या २ वर्षात हार्ट अटॅकच्या प्रकारांमध्येही अचानक वाढ झाल्याचे दिसून येते. 

एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा भारतात कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. तेव्हा लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव गेले. काहींचा कोरोनामुळे तर काहीजणांना अन्य आजारामुळे मृत्यू झाला. परंतु आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय की, कोरोना व्हायरल रोखण्यासाठी जी लस तयार करण्यात आली होती त्यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. 

ICMR करतंय रिसर्चलोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता ICMR एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल. या रिसर्चमध्ये आयसीएमआर भारतातील युवा लोकसंख्येला कोविड लसीकरण आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटना यात काही संबंध आहे का याचा शोध घेणार आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट काही काळापासून पेंडिग आहे. हा प्रकाशित करण्याआधी ICMR आतापर्यंत निष्कर्षावर चर्चा करत आहे. ICMR रिपोर्टबाबत अतिशय गंभीरपणे अभ्यास करतंय. जोपर्यंत संपूर्ण खातरजमा केली जात नाही तोपर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात येणार नाही. 

'या' ३ प्रश्नांची उत्तरे शोधणारहृदयविकारामुळे अचानक होणारे मृत्यू आणि कोविड लसीकरण यांच्या संबंधाबाबत रिसर्च करण्यासाठी आयसीएमआर काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. १) लोकांचा मृत्यू लसीकरणानंतर नैसर्गिक कारणामुळे झालाय का?२) कोविड रोखण्यासाठी बनवण्यात आलेली लस मृत्यूसाठी जबाबदार आहे का?३) मृत्यू होणारा व्यक्तीला कोविडचा गंभीर आजार होता की, दिर्घकाळ तो कोरोनामुळे पीडित होता का?

४० हॉस्पिटलमधून मागवला डेटा या स्टडीच्या रिसर्चसाठी ICMR ने ४० हॉस्पिटलमधील क्लिनिकल रजिस्ट्रेशनची माहिती घेतली. यातील अनेक रुग्णांचा डेटा AIIMS मधूनही घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ हजार रुग्णांच्या नमुन्यापैकी ६०० लोकांच्या मृत्यूची माहिती मिळाली. मार्च महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कोरोनानंतर हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर चर्चा सुरू आहे आणि ICMR याबाबत स्टडी करत आहे. लसीकरणाचे आकडे आमच्याकडे आहेत. ICMR मागील ३-४ महिन्यांपासून यावर अभ्यास करत आहे. हा रिपोर्ट ६ महिन्यात येणार होता. परंतु जुलै महिन्यापर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक केला जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. 

इंडियन हार्ट असोसिएशननुसार, मागील वर्षात ५० वयापेक्षा कमी ५० टक्के आणि ४० वयापेक्षा कमी २५ टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका पाहायला मिळाला. तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त हृदयासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. हृदयाच्या आजारासाठी ब्लड प्रेशर, तणाव, शुगर, अनियमित जीवनशैली हे मोठे कारण आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHeart Attackहृदयविकाराचा झटका