शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:50 IST

मागील काही दिवसांपासून दहशतावादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे. आज जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अधिकाऱ्याला वीरमरण आले. दुडू भागात सीआरपीएफचे जवान नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. 

एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे एक अधिकारी शहीद झाले. तेथील संपूर्ण परिसरात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. उधमपूरच्या दुडू भागात आधीच घुसलेल्या दहशतवाद्यांनी CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (SOG संयुक्त दलावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफ अधिकारी गोळ्यांनी जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

दुपारी ३.३० च्या सुमारास हा हल्ला झाल्याचे कळते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात सीआरपीएफच्या १८७ व्या बटालियनच्या एका निरीक्षकाला गोळी लागली आणि नंतर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त फौजा घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीदIndian Armyभारतीय जवान