पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन घटले आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकार साखर निर्यातीवर प्रतिबंध घालू शकते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी म्हटले आहे की, भारत ऑक्टोबर महिन्यापासून पुढील 11 महिन्यांसाठी साखर निर्यातीवर बंदी घालू शकतो. साखर निर्यातीवर बंदी घालण्याची ही भारताची सात वर्षांतील पहिली वेळ असेल.
भारत पुढील महिन्यापासून साखर निर्यातीव प्रतिबंध घालू शखतो, अशी माहिती समोर आल्यानंतर, अरब देशांचे टेन्शन वाढले आहे. कारण भारताने यापूर्वी तांदूळ आणि गव्हाच्या निर्यातीवरही प्रतिबंध लादले आहे. एवढेच नाही, तर कांद्याच्या निर्यातीवरही जबरदस्त शुल्क लावण्यात आले आहे. यामुळे अरब देशांमध्ये या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता साखरे वरील निर्यात बंदीच्या नर्णयानंतर, अरब देशांत साखरेचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील.
भारतातील साखरेची सर्वाधिक निर्यात अरब देशांत -सौदी अरेबियाच्या एका न्यूज वेबसाइटने म्हटल्यानुसार, भारताने साखर निर्यातीवर प्रतिबंध लादणे अरब देशांसाठीही चिंतेचा विषय आहे. कारणम भारताच्या एकूण साखर उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक साखरेची निर्यात अरब देशांमध्ये होते.
आधीच साखरेचे दर गेल्या अनेक वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत. यातच भारतातील उसाचे उत्पादन घटल्याने, जागतिक बाजारात साखरेच्या किमती वाढतील. परिणामी जागतिक बाजारपेठेत आणि प्रामुख्याने अरबस्तानात महागाई वाढण्याची मोठी शक्यता आहे, कारण अरब देशांकडून भारतातूनच सर्वाधिक साखर आयात केली जाते.