केरळमध्ये मंकीपॉक्समुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. यामुळे देशभरातील संशोधक चिंतेत सापडले होते. या तरुणाच्या नमुन्यांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा ए.२ व्हेरिअंट मिळाला आहे, यामुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. हा व्हेरिअंट अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पसरलेल्या व्हेरिअंटपेक्षा खूप वेगळा आहे.
पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये जगातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तिथे मंकीपॉक्स व्हायरसचा कांगो व्हेरिअंट आढळत आहे, ज्याला गंभीर मानले जात आहे.
नवी दिल्लीतील CSIR च्या IGIB संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात देखील केरळमधील पहिल्या दोन मंकीपॉक्स संक्रमित रुग्णांमध्ये विषाणूचे A.2 व्हेरिअंट सापडले होते. हा व्हेरिअंट बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. भारतातील 12 पैकी 10 रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे या व्हेरिअंटची पुष्टी करण्यात आली आहे.
केरळमधील तरुणाचा मृत्यू एन्सेफलायटीस या आजारामुळे झाल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. रुग्णाच्या मेंदूला सूज येऊ लागते आणि हळूहळू तो कोमात जातो, असा हा आजार आहे.दिल्ली एम्सच्या माजी डॉक्टरांनी भारतातील अप्रमाणित अँटीबायोटिक्सच्या वापराबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच आलेल्या अहवालाला दिशाभूल करणारा आणि अन्यायकारक म्हटले आहे. 2019 मध्ये भारतात विकल्या जाणार्या 47 टक्के अँटीबायोटिक फॉर्म्युलेशनला परवानगी मिळालेली नव्हती, असे या अहवालात म्हटले होते.