शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

३३ टक्केचे स्वप्न, प्रत्यक्षात १५ देखील नाही; विधानसभा निवडणुकांत चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:41 PM

कर्नाटकच्या राजकारणात ‘निम्म्या लोकसंख्ये’ची फसवणूक; सर्वच पक्ष म्हणतात, आज नाही उद्या देऊ संधी

बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात ‘अर्ध्या लोकसंख्येला’ पुन्हा एकदा ‘पूर्ण न्याय’ मिळालेला नाही. देशातील इतर राज्यांप्रमाणे येथील राजकीय पक्षांनीही महिला उमेदवारांना तिकीट देण्यात कंजूसपणा दाखवला आहे. अनेक दशकांपासून संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची चर्चा होते; परंतु संसद आजपर्यंत कायदा करू शकलेली नाही.

कर्नाटकातील सत्तेचे प्रमुख दावेदार असलेल्या काँग्रेस आणि  भाजपने यावेळीही महिला उमेदवारांवर विश्वास ठेवलेला नाही. भाजप आणि काँग्रेसने २२४ जागांपैकी केवळ १२-१२ महिलांना तिकीट दिले आहे. ते ६ टक्केपेक्षा कमी आहे. गेल्या वेळी फक्त सात महिला कर्नाटक विधानसभेत पोहोचू शकल्या होत्या, म्हणजे फक्त ३ टक्के. आज देशातील संसदेतील कोणत्याही विधानसभेत १५ टक्केही महिला नाहीत. चार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी केवळ ७८ महिला खासदार विजयी झाल्या होत्या. ही संख्या १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

६० वर्षांत प्रथमच१९६३ मध्ये नागालँडच्या निर्मितीनंतर ६० वर्षांनंतर २०२३ मध्ये प्रथमच राज्यात महिला आमदार निवडून आल्या. जनतेने एक नाही तर दोन महिलांना जिंकून इतिहास रचला.

उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच...देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच सर्वाधिक महिलांचा विजय झाला. २०२२च्या निवडणुकीत एकूण ४७ महिला आमदार निवडून आल्या होत्या.

कर्नाटकमध्ये महिला आमदारवर्ष        संख्या१९६७        ५१९७२        ०१९७८        ८१९८३        ११९८५        ८१९९४        ७१९९९        ६२००४        ६२००९        ३२०१३        ६२०१८        ७

टीएमसी अव्वलतृणमूल काँग्रेसने पं. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत २९४ पैकी ५० तिकिटे महिलांना देण्यात आली. यापैकी ३३ महिला विजयी झाल्या. देशातील कोणत्याही विधानसभेत एकाच पक्षाकडून विजयी होणाऱ्या महिलांची ही सर्वाधिक संख्या आहे.

विधानसभेत महिला आमदार    हिमाचल    १.४७%    कर्नाटक    ३.१४%    आसाम    ४.७६%    तेलंगणा    ५.१४%    महाराष्ट्र    ८%    मध्य प्रदेश    ९.१३%    छत्तीसगड    १४.४४%    बंगाल    १३.७०%    झारखंड    १२.३५%    राजस्थान    १२.००%    उत्तर प्रदेश    ११.६६%

पंचायतराज संस्थांमध्ये महिलांची स्थिती? राज्य    एकूण महिला    टक्केवारीमहाराष्ट्र    १,२८,६७७    ५३.५ टक्के कर्नाटक    ५,१०३०    ५०.१ टक्केआंध्र प्रदेश    ७८,०२५    ५० टक्के जम्मू-काश्मीर    १३,२२४    ३३.२ टक्के आसाम    १४,६०९    ५४.६ टक्के

टॅग्स :ElectionनिवडणूकKarnatakकर्नाटक