राजेंद्र कुमार लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर (शहर) मतदारसंघातून उभे असून, त्यांना तुल्यबळ असा उमेदवार समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पक्ष (बसप), काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला (आप) अजून तरी सापडलेला नाही. दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. आझाद आणि योगी आदित्यनाथ संघर्षात विरोधी पक्ष चंद्रशेखर यांना पाठिंबा देतील का? याचे उत्तर वरील प्रमुख विरोधकांनी दिलेले नाही.
अखिलेश यादव योगी यांच्याविरोधात एक बळकट चेहरा मैदानात उतरवू इच्छितात, अशी चर्चा आहे. त्या दिशेने यादव सपाच्या अनेक नेत्यांसह योगी आदित्यनाथ यांच्यापासून अंतर राखणारे भाजपचे आमदार डॉ. राधा मोहन अग्रवाल यांची शक्यता विचारात घेत आहेत. अग्रवाल यांच्याकडून कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे अखिलेश यादव त्यांच्याशी थेट संपर्क साधत नाहीत. अग्रवाल भाजप सोडून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.
भाजपचा बालेकिल्लागोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून, गेल्या ३३ वर्षांपासून तेथे कोणी दुसरा जिंकू शकलेला नाही. १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला.