नवी दिल्ली : बवाना औद्योगिक परिसरात असलेल्या एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १७ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे कार्य सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत ७ जण जखमी झाले असून त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ७ जखमींपैकी १ व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
बवाना औद्योगिक परिसरात आग लागली. राजधानी दिल्लीतील बवाना औद्योगिक भागात एका उत्पादन युनिटला भीषण आग लागली, त्यात एकाचा मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याआधी बुधवारी रोहिणी न्यायालय संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील न्यायाधीशांच्या चेंबरला आग लागली, त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या थिनर कारखान्यात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कारखान्यातून आगीचा भडका उठत आहेत. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. बचावकार्य सुरू असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग दिसत आहे आणि त्याच्या आगीच्या ज्वाळाही भीषण दिसत आहेत. नुकतेच दिल्लीतील मुंडका येथे एका ४ मजली इमारतीत भीषण आग लागली होती. या आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक बेपत्ता झाले होते. या भीषण आगीच्या घटनेमुळे एमसीडीच्या तीन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.