नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा जिल्ह्यातील एका मुलीने इच्छेनुसार लग्न न केल्याने लग्नाआधीच कुटुंबीयांच्या चिंतेत वाढ केली असून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार घरात लग्नाची तयारी सुरू होती. २७ नोव्हेंबर रोजी वऱ्हाडी मंडळी येणार होती आणि त्यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी संबंधित मुलीचे वडील नातेवाईकांसह टिळा लावण्यासाठी मुलाच्या घरी गेले होते. दरम्यान, संधी मिळताच मुलगी पळून गेली. वडील टिळा लावून घरी परतले असता घटनेची माहिती कळताच त्यांना धक्काच बसला.
दरम्यान, कुटुंबीयांनी मुलीच्या नातेवाइकांकडून सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकुप भागात राहणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आज होणार होतं लग्न
कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितले, "२० नोव्हेंबरला मी टिळा लावण्याच्या कार्यक्रमासाठी मुलाच्या घरी गेलो. २७ नोव्हेंबर रोजी लग्नाचा कार्यक्रम होता. मी टिळा लावण्याच्या कार्यक्रमातून परत आलो तेव्हा पत्नीने मला सांगितले की, मुलगी बाजारात गेली असून ती परत आली नाही, नातेवाईकांचा शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. भरतकुप भागातील एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती मिळाली आहे." तरुणावर गुन्हा दाखल करण्यासोबतच पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
स्थानिक पोलीस कालिंजर नरेश कुमार प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळताच होताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरूणी भरतकुप परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत पळून गेली आहे. दोघांचे मोबाईल ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश होईल.