मुंबईतून हैदराबादला जाणारे एक हेलिकॉप्टर आज पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ कोसळलं. या अपघातात ४ जण जखमी झाले. कॅप्टनला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित तीन जणांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे हेलिकॉप्टर खासगी विमान कंपनीचे आहे. घटनेच्या वेळी हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादकडे जात होते. हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आली आहे. घटनास्थळी अनेक लोकही दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात बळी पडलेले हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचे होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
केवळ ९६ तास ऑक्सिजन अन्...; सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासात ३ धोके कोणते?
झारखंडमधील जमशेदपूर येथील विमानतळावरून दोन आसनी विमान मंगळवारी बेपत्ता झाले होते. विमानाचा शोध सुरू असताना प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि विमानातील प्रशिक्षण वैमानिकाचे मृतदेह गुरुवारी चांदिल धरणात सापडले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सेसना-152 या खासगी विमान कंपनीच्या प्रशिक्षण विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
मंगळवारी सोनारी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमान बेपत्ता झाले होते. यानंतर धरणाच्या जलाशयासह आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी एक विमान जलाशयात कोसळल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. आदित्यपूर येथील प्रशिक्षणार्थी वैमानिक शुभ्रदीप दत्ता यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला, तर पायलट-इन-कमांड कॅप्टन जीत शत्रू आनंद, पाटणा येथील रहिवासी यांचा मृतदेह नंतर सापडला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन जमशेदपूर येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विशाखापट्टणम येथील नौदलाचे १९ सदस्यीय पथक बेपत्ता विमानाचा शोध घेत आहे.