केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:28 PM2022-10-18T12:28:16+5:302022-10-18T12:29:05+5:30

Uttarakhand Helicopter Crash : या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared in Uttarakhand | केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

googlenewsNext

उत्तराखंड : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भाविकांना घेऊन जाणारे आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधीलकेदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीजवळ धुक्यामुळं हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सहा भाविकांचा मृत्यू झाला. या बातमीला उत्तराखंड मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. 



 

21 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथला भेट देणार आहेत. केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा नरेंद्र मोदी घेतील. यानंतर केदारनाथ मंदिरात दर्शन घेतील. 21 ऑक्टोबर रोजी केदारनाथला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी तेथे रात्रभर मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला ते बद्रीनाथला भेट देणार आहेत.

Web Title: A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.