लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/भोपाळ : निवडणुकीपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये निकाल हाती आले असून, भाजपने सपशेल पराभव स्वीकारला असल्याचा दावा काँग्रेसनेमध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दुसरी यादी जाहीर केल्यानंतर केला आहे. काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी दावा केला की ज्या लोकांनी मध्य प्रदेशात ‘गुपचूप’ सरकार स्थापन केले त्यांना जनता सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. भाजपने सोमवारी एकूण ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने मध्य प्रदेशातील पराभव स्वीकारला आहे आणि "खोट्या आशेचा शेवटचा जुगार" खेळला जात आहे, असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे.
मोठ्या नेत्यांना राज्यात उतरवण्याचा सरळ अर्थ असा आहे की, पक्ष म्हणून ते (भाजप) इतके बदनाम झालेत की, निवडणुका जिंकू शकत नाहीत. त्यामुळे केवळ मोठ्या नावांवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला विधानसभेसाठी उमेदवार मिळत नाहीत तर मतदानासाठी जनता कुठून मिळेल?. भाजपचे डबल इंजिन सरकार दुहेरी पराभवाकडे वाटचाल करत आहे. - कमलनाथ, काँग्रेस नेते