शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:45 IST

एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचे फायदे जगाला होत आहे, तेवढेच आव्हाने आणि धोकेही वाढले आहेत. एआयचा गैरवापर करून सायबर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश प्रामुख्याने हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणते क्षेत्र रडारवर? - जगातील एकूण डीडीओएस हल्ल्यांमध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये यूजर्सला विविध वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांपर्यंत पोहोचविण्यास अडथळे निर्माण केले जातात.- विशेषतः  शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागातील सेवांवर हल्ले करणे हे  सोपे असते.

चॅटजीपीटीचा वापरसायबर हल्लेखोर चॅटजीपीटीच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने एखादा मेल लिहून तो टार्गेट असलेल्या व्यक्तीला पाठवतात. त्यालाही अनेकजण बळी पडतात.

२००% वाढजगात सप्टेंबर २०२२ नंतर मानव-संचालित रॅन्समवेअर हल्ल्याचे प्रमाण २०० टक्क्याने वाढले. एखाद्या ठरावीक व्यक्तीऐवजी संपूर्ण कार्यालय, विभाग वा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी रॅन्समवेअर हल्ले केले जातात. ओळख लपविण्यासाठी हल्लेखोर रिमोट-एन्क्रिप्शनसह क्लाउट तंत्रज्ञानाचाही वापर करतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान