मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन पोलीस जखमी आहेत. वाहनाला आष्टा पोलीस स्टेशन परिसरातील बेदाखेडी गावाजवळ अपघात झाला. वाहन अनियंत्रित होऊन उलटले.
"तुम्ही शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा..."; अमित शाहांचं नक्षलवाद्यांना आवाहन
जखमी पोलिसांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी भोपाळहून देवास जिल्ह्यातील खाटेगाव संदलपूरला जात होते. त्यांचा ताफा आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेदाखेडी गावाजवळ पोहोचताच, त्यांच्या ताफ्यातील एक गाडी नियंत्रणाबाहेर गेली यामुळे उलटली.
या अपघातामध्ये एएसआय एसपी सिमोलिया, नीरज शुक्ला आणि आकाश अटल यांच्यासह तीन पोलिस जखमी झाले. जखमी पोलिसांना तात्काळ सिहोर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातामध्ये फक्त तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.