नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात 14 जानेवारीला एका व्यक्तीने ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनखाली आल्यानंतर देखील तो सुदैवाने जिवंत बचावला, मात्र त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे कापले गेले आहेत. यादरम्यान रेल्वेचे डॉक्टर देवदूत बनून त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणून त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो घरगुती कलहामुळे त्रस्त आहे. सासू आणि पत्नी त्याचा छळ करतात.
डॉक्टर बनले देवदूत माहितीनुसार, शनिवारी नरसिंगपूर रेल्वे स्थानकावर कोणीतरी माहिती दिली की रुळांवर एक तरुण जखमी अवस्थेत पडला आहे. माहिती मिळताच रेल्वे डॉक्टर आणि रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुळांवर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला त्यांनी पाहिला. तो गंभीर अवस्थेत खाली पडला होता. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकाही बोलावण्यात आली. घटनास्थळीच डॉ.आर.आर. कुर्रे यांनी तरुणावर उपचार सुरू केले.
असा केला आत्महत्येचा प्रयत्न घटनास्थळी उपचार घेतल्यानंतर तरुणाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरसिंगपूर रेल्वे स्थानकावरून इटारसीकडे जाणाऱ्या प्रयागराज-छिवकी पॅसेंजरला धडकून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक तणाव असल्याचे तरुणाने सांगितले. त्याच्या घरात वाद आहे. त्याची सासू आणि पत्नी त्याला सातत्याने 'पागल' म्हणून डिवचत असतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"