उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मिरवणुकीत विजेचा धक्का लागून पायल नावाच्या घोडीचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी घोडीच्या मालकाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. लक्षणीय बाब म्हणजे मालकासोबत खुशबू ही मृत घोडीची खरी बहीण देखील होती. पायलच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी येथे घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर निवेदन घेण्यासाठी एडीएम ओपी बनकर यांना कार्यालयातून बाहेर पडावे लागले.
दरम्यान, एडीएमसमोर मालकाने मृत घोडीची बहिण खुशबू हिला तुझी बहीण पायलला न्याय हवा आहे का, असे विचारले असता तिने मान डोलावून होकार दिला. खरं तर तीन दिवसांपूर्वी लग्नाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने घोडीचा मृत्यू झाल्याचे घोडी मालकाने सांगितले. त्यांनी उद्यान व्यवस्थापन, तंबू मालक आणि लाईट डेकोरेशनमध्ये निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
नवरदेव खाली उतरताच विजेच्या धक्क्याने घोडीचा मृत्यू घोडीचे मालक हम्माद सिद्धिक यांनी सांगितले की, नवरदेव घोडीवरून खाली उतरताच तो थोडा पुढे सरकला आणि घोडीचा पाय उघड्या विजेच्या तारांच्या कचाट्यात आला. मी उपस्थितांना वीज घालवावी असे सांगितले. पण लाईट बंद केल्यावर घोडी वेदनेने मरण पावली होती. घोडी चार महिन्यांची गरोदर होती. ही घटना सामान्य माणसाच्या लग्नातही घडू शकते. आजूबाजूला लहान मुलेही खेळत होती. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात तीव्र नाराजी आहे. उद्याने आणि रिसॉर्ट्समध्ये सजावटीसाठी विजेच्या तारा लावल्या जातात. त्यांच्यात करंट आहे. घोडीच्या मृत्यूला तंबू आणि सजावट करणारे थेट जबाबदार आहेत. असा आरोपही मृत घोडीच्या मालकाने केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"