शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

"पत्नीकडून घटस्फोट घे", 8 वर्षांपूर्वीच्या प्रेयसीने दबाव टाकताच तरूणाने तिला संपवलं; मृतदेह फेकला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 3:10 PM

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका व्यक्तीने गळा दाबून आपल्या प्रेयसीची हत्या केली.

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका व्यक्तीने गळा दाबून आपल्या प्रेयसीची हत्या केली. यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याने या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत होते. मात्र, आरोपी गावात लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागली आणि मग त्यांना अटक करण्यात आली. 

खरं तर कोतवाली नगरमधील बरईपूर येथे राहणाऱ्या सिराजचे सलमा नावाच्या तरुणीसोबत मागील आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सिराजच्या कुटुंबीयातील लोकांनी त्याचे लग्न वेगळ्या मुलीसोबत लावून दिले. यामुळे सलमाचा राग अनावर झाला आणि तिने सिराजवर त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला. यामुळे वैतागलेल्या सिराजने आपल्या चुलत भावासोबत मिळून प्रेयसी सलमाचा काटा काढायचे ठरवले. 

मृतदेह फेकला विहिरीत31 डिसेंबर रोजी सिराजने सलमा हिला फिरायला जायचे सांगून बोलावले आणि गाडीत तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह हसनपूर येथील विहिरीत टाकून आरोपी फरार झाले. याप्रकरणी एसओजी प्रभारी प्रवीण गौतम आणि बछरावन पोलिसांचे एसएचओ नारायण कुशवाह यांनी सांगितले की, चकमकीनंतर हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक