...त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ;PM मोदींनी सांगितली २०१८ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:20 PM2023-08-10T17:20:40+5:302023-08-10T17:26:07+5:30
Parliament No-confidence Motion: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत.
नवी दिल्ली: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत. देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार जो विश्वास दाखवला आहे. त्यासाठी देशाच्या कोट्यवधी जनतेचे आभार, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली.
ईश्वर खूप दयाळू असतात. कुणाला तरी ते माध्यम बनवतात. मी याला ईश्वराचा आशीर्वाद मानतो की त्यांनी विरोधकांना सुचवलं आणि ते प्रस्ताव घेऊन आले. २०१८ मध्येही हा ईश्वराचाच आदेश होता. त्यामुळे विरोधक अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट. हे मी तेव्हा म्हणालो होतो आणि शेवटी तसचं झालं. विरोधकांकडे जेवढी मतं होती, तेवढी मतंही त्यांना मिळवता आली नव्हती, असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर साधला.
#WATCH | PM Narendra Modi says, "God is very kind and speaks through some medium...I believe that it's the blessing of God that opposition has brought this motion. I had said during the no-confidence motion in 2018 that it was not a floor test for us but a floor test for them… pic.twitter.com/GHysTGoUP6
— ANI (@ANI) August 10, 2023
आम्ही जेव्हा जनतेचा कौल मागितला, तेव्हा जनतेनेही पूर्ण ताकदीने यांच्यासाठी अविश्वास घोषित केला. एनडीएला आणि भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. तुम्ही पक्क केलं आहे की एनडीए आणि भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून जनतेच्या आशीर्वादाने विजयी होतील, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.