शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

...त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ;PM मोदींनी सांगितली २०१८ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 5:20 PM

Parliament No-confidence Motion: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत.

नवी दिल्ली: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत. देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार जो विश्वास दाखवला आहे. त्यासाठी देशाच्या कोट्यवधी जनतेचे आभार, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. 

ईश्वर खूप दयाळू असतात. कुणाला तरी ते माध्यम बनवतात. मी याला ईश्वराचा आशीर्वाद मानतो की त्यांनी विरोधकांना सुचवलं आणि ते प्रस्ताव घेऊन आले. २०१८ मध्येही हा ईश्वराचाच आदेश होता. त्यामुळे विरोधक अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट. हे मी तेव्हा म्हणालो होतो आणि शेवटी तसचं झालं. विरोधकांकडे जेवढी मतं होती, तेवढी मतंही त्यांना मिळवता आली नव्हती, असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर साधला. 

आम्ही जेव्हा जनतेचा कौल मागितला, तेव्हा जनतेनेही पूर्ण ताकदीने यांच्यासाठी अविश्वास घोषित केला. एनडीएला आणि भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. तुम्ही पक्क केलं आहे की एनडीए आणि भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून जनतेच्या आशीर्वादाने विजयी होतील, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस