बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे प्रेमविवाहासाठी मुस्लीम मुलीने घरातून पळून जाऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. खरं तर या तरूणीने आपले नाव खानचे सौम्या असे केले. इलमा बनलेल्या सौम्या या मुस्लीम मुलीने बरेली जिल्ह्यातील मुनी आश्रमात प्रियकर सोमेश शर्मासोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर इलमा खानची सौम्या बनलेल्या मुलीने आता आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून संरक्षणासाठी प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
इलमा खान उर्फ सौम्या ही बदायू येथील रहिवासी आहेइलमा खान उर्फ सौम्या ही उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील पारोसी गावची रहिवासी आहे. माहितीनुसार, इलमा उर्फ सौम्या 10वी पास आहे आणि रेकॉर्डनुसार तिचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त आहे. इलमा खानच्या म्हणण्यानुसार, ती सोमेश शर्माला मागील अनेक वर्षांपासून ओळखते. खरं तर सोमेश आणि इलमा यांच्या घरांमध्ये सुमारे 500 मीटरचे अंतर आहे. सध्या सोमेश दिल्लीत खासगी नोकरी करतो.
सोमेशची इलमाच्या घरी ये-जा असायचीइलमा उर्फ सौम्याने सांगितले की, सोमेश आमच्या घरी ये-जा करायचा. माझी त्याच्याशी आधी मैत्री झाली, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरातून पळून बरेली गाठले. इथे मुनी आश्रमात इलमा खानचे धर्मांतर केले आणि ती सौम्या बनली आणि मंदिरात तिचा प्रियकर सोमेशशी विवाह केला. या विवाहाबाबत पंडित केके शंखधर यांनी तिची शुद्धी केली, त्यानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.
इलमा खान उर्फ सौम्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तिने कोणत्याही दबावाखाली हिंदू धर्म स्वीकारला नाही. मला इस्लाममध्ये तिहेरी तलाक आवडत नाही. हिंदू धर्मात लग्न करून मला सुरक्षित वाटते आणि मला पहिल्यापासून हिंदू धर्म आवडतो, असे तिने सांगितले. याशिवाय इलमाने सांगितले की, लग्नानंतर तिच्या बहिणीचा छळ होत होता, त्यामुळे ती घाबरली होती. मात्र, आता तिने गावच्या सरपंचाकडून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"