नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जग बदलून टाकलं आहे. भारतात गेल्या काही महिन्यांपासून जिथे लोकांना असं वाटलं होतं की आता कोरोना महामारी पूर्णपणे संपली आहे. त्याचवेळी लोकांच्या या विश्वासाला बगल देत कोरोनाने पुन्हा दार ठोठावले आहे. भारतासह जगभरात कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट आढळले आहेत. हे ओमायक्रॉन (Omicron) चे सब व्हेरिएंट आहेत. या नवीन व्हेरिएंटला BA.5.1.7 आणि BF.7 अशी नावे देण्यात आली आहेत. हे नवीन व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याचे मानले जाते आणि सणाच्या काळात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
Omicron BF.7 म्हणजे काय?Omicron चे नवीन सब-व्हेरियंट BF.7 वायव्य चीनच्या मंगोलिया स्वायत्त प्रदेशात प्रथम आढळला आणि हा सब व्हेरिएंट चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार आहे. ओमायक्रॉनचा हा नवीन सब व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे, अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्येही केसेस आढळून येत आहेत. नवा ओमायक्रॉन (Omicron) BF. 7 ला 'ओमायक्रॉन स्पॉन' असेही म्हणतात. भारतातही Omicron BF. 7 चा प्रकरण समोर आले आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये मधील हे समोर आलंय. अशा परिस्थितीत सण-उत्सवाच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
तज्ञांनी म्हटलं की, ओमायक्रॉन बी.एफ. 7 व्हेरिएंट आधीच अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटची जागा घेईल अशी भीती आहे. BF. 7 व्हेरिएंटचा संसर्ग दर खूप जास्त आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरिएंटची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, घाबरण्याची गरज नाही, परंतु हृदयविकार, किडनीचे आजार आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये त्याची लक्षणे गंभीर असल्याचे दिसून येते.
काय आहेत लक्षणे?सतत खोकलाऐकू येण्यास अडचणछातीत दुखणेअंग कापणेवास घेण्यास समस्या
काळजी घेण्याची गरज नवीन व्हेरिएंट आणि सब व्हेरिएंटमुळे कोविड 19 रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागतेय. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येतात. जेव्हा जेव्हा कोविडचा नवीन व्हेरिएंट येतो तेव्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वाढते. सणासुदीच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी बाहेर पडतात जेथे सोशल डिस्टेंसिंगचा नियम अजिबात पाळला जात नाहीत. यासोबतच लोक मास्कशिवाय फिरतात त्यामुळे या काळात कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढू लागतात असं तज्ञांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"