नवी दिल्ली : अनेकदा आपण वेळ वाचवण्यासाठी जेवण ऑनलाईन (Online Food) मागवतो. मात्र दिल्लीत एका व्यक्तीने कॉफी ऑनलाईन मागवल्यानंतर धक्कादायक घटना घडली. या व्यक्तीने दिल्लीतील थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरुन (Zomato) एक कॉफी ऑर्डर केली. कॉफी (Coffee) पाहताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचा तुकडा आढळला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतं आहे.
सुमित सौरभ नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन ही धक्कादायक माहिती दिली आहे आणि त्याच्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. सुमितने झोमॅटोवरुन दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली आणि कॉफीमध्ये चिकनचा तुकडा आढळल्यानंतर त्याने ट्विटरवरुन झोमॅटो आणि थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटला खडसावलं आहे. सुमितने त्याच्या पत्नीसाठी ही कॉफी मागवली होती जी शाकाहरी आहे.
सुमितने ट्वीटमध्ये म्हटले आहे, “मी झोमॅटोवरुन थर्ड वेव्ह इंडिया नावाच्या रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली होती, मात्र त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. कॉफीमध्ये एक चिकनचा तुकडा आढळला. दयनीय, तुमचा (Zomato) माझा संबंध आज अधिकृतपणे संपला."
सुमित सौरभने 3 जून रोजी ट्विटरवर ही गोष्ट शेअर केली. त्याने दिल्लीतील थर्ड वेव्ह इंडिया नावाच्या त्याच्या नेहमीच्या ठिकाणाहून कॉफी मागवली होती. त्या व्यक्तीने झोमॅटोच्या माध्यमातून ऑर्डर दिली होती. मात्र, कॉफी चाखल्यानंतर शाकाहारी असलेल्या त्यांच्या पत्नीला त्यात चिकनचा छोटा तुकडा सापडला. सुमितने झाकणावर चिकनचा तुकडा असलेल्या कॉफीच्या कपचा फोटो पोस्ट केला.