शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कौतुकास्पद! स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 4:32 PM

पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते.

गोंडा : पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका पोलीस जवानाने ही प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली आहे. इथे लहान मुले चक्क पोलिसाकडून शिक्षणाचे धडे घेत आहेत. खरं तर 'खाकीतील शिक्षक' गरीब मुलांमध्ये चांगल्या शिक्षणाचा प्रकाश जागवत आहे. कर्तव्यासोबतच गोंडा जिल्ह्यातील एक पोलीस हवालदार समाजातील प्रतिमा सुधारण्याचे काम करत आहे. हवालदार मो. जाफर असे या पोलीस शिक्षकाचे नाव आहे. ते ड्युटी संपल्यानंतर गरीब मुलांना रोज एक तास मोफत शिकवतात. स्थानिक पोलीस चौकीच्या शेजारी असलेल्या जाफर चाचारी इथे ते झाडाखाली शाळा चालवतात. येथे ते कोणत्याही मुलाकडून फी घेत नाहीत.

पोलीस शिक्षकामुळे गरिबांच्या शिक्षणाला चालना दरम्यान, पोलीस सरांच्या या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतची मुले शिकण्यासाठी येतात. इथे मुलांना एका तासात गणित, विज्ञानासह जवळपास सर्वच विषयांचा अभ्यास शिकवला जातो. या शाळेत नवोदय शाळेत प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेली मुलेही सहभाही होतात. या शाळेत रोज येणारे करण आणि शिवानी कश्यप सातवीच्या वर्गातले असून त्यांनी सांगितले की, पोलीस सर खूप छान शिकवतात. ते त्यांना खूप मदत करतात. त्यांच्याकडे खासगी शिकवणी लावण्यासाठी पैसे नव्हते. पण मो. जाफर सरांच्या क्लासची खूप मदत झाली. या दोन मुलांचे वडील रणवीर सिंग यांनी म्हटले, "पोलीस शिक्षक मुलांना रोज मोफत शिकवतात. हा एक अद्भुत उपक्रम आहे."

'खाकीतला शिक्षक'हवालदार मो. जाफर सांगतात की, ड्युटी संपल्यानंतर ते कुठेही फिरायला जात नाहीत. त्याऐवजी ते दररोज गरीब मुलांना शिक्षण देतात. विज्ञान शाखेतून पदवीधर असलेल्या मो. जाफर यांचे नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. मो. जाफर यांनी आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आता त्यांची इच्छा आहे की मी शिकवलेल्या या मुलांपैकी एक जरी यशस्वी झाला तर त्यांची इच्छा पूर्ण होईल. गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चाचरी पोलीस चौकीच्या शेजारी पोलीस शिक्षकाची ही शाळा दररोज दुपारी 4 वाजता भरते असे त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसTeacherशिक्षकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीStudentविद्यार्थी