तिरुवनंतपुरम : २०० वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी भारतातील त्रावणकोरमध्ये दूरदर्शी राणीने पुढाकार घेतल्याचे मिळालेल्या नोंदींवरून समोर आले आहे.
महाराणी गौरी पार्वतीबाई यांनी ब्राह्मण समाजातील महिलांशी विवाह करण्यासाठी ‘वरदक्षिणा’ मागण्याच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १८२३ मध्ये हुंड्याची रक्कम मर्यादित करणारे फर्मान जारी केले. त्रावणकोर राज्य करणाऱ्या राणीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता.
मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षे
राणीचा हा शाही हुकूम, राज्य अभिलेखागारात उपलब्ध असून, हा धोका या भागात खोलवर रुजला होता, असे सूचित करतो.
त्यांच्या ऐतिहासिक आदेशात ब्राह्मण समाजातील ‘नंबूथिरी’ आणि ‘पोट्टी’ या विभागातील स्त्रियांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले.
तत्कालीन सामाजिक चालीरीतींकडे लक्ष वेधून त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात प्रचलित असलेल्या व्यवस्थेनुसार समाजातील मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षांच्या आत केले पाहिजे.