शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 6:47 AM

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती.

नवी दिल्ली : न्यूयाॅर्कहून भारताकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीस दिल्ली पोलिसांनी ४२ दिवसांनंतर बंगळुरू येथे शनिवारी अटक केली. मात्र, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत न पाठवता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

या घटनेमुळे विमानात दिल्या जाणाऱ्या मद्याबाबत धोरणाचा  एअऱ इंडियाने फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. व्यवस्थापनाने संबंधित विमानाच्या ४ कर्मचाऱ्यांना कामापासून दूर केले आहे. शंकर मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. महिलेने एअर इंडियाकडे तक्रार केली होती. आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी बंगळुरू येथे अटक केली. 

बहिणीच्या घरी बसला होता लपून

दिल्लीचे पोलिस उपायुक्त (विमानतळ) रविकुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी बंगळुरूमधील बहिणीच्या घरी लपून बसला होता. त्याने आपले सर्व फोन बंद केले होते. तो जागा बदलत होता. त्याच्या फोन हिस्ट्रीच्या माध्यमातून त्याचे ठिकाण शोधले. शुक्रवारी तो म्हैसूरमध्ये होता. तो टॅक्सीने प्रवास करीत असताना पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले पण, तो निसटला.

२ तास ठेवले पीडित महिलेला ताटकळत

पीडित महिलेचे एक सहप्रवासी असलेले डॉ. सुगत भट्टाचारजी यांनी एअर इंडियाला दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले की, आरोपीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्यानंतर हवाई सुंदरींनी तिला स्वच्छ होण्यास मदत केली. आसन बदलून मागितले. ४ आसने उपलब्ध असतानाही तिला २ तास ताटकळत ठेवले. २ तासांनी तिला दुसरे आसन देण्यात आले.

ब्लॅकमेलिंगचा संशय

शंकरचे वडील श्याम मिश्रा यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुलाविरोधातील आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलेला आम्ही नुकसानभरपाई दिली आहे, तरीही तक्रार करण्यात आली. ब्लॅकमेल करण्यासाठी तिने असे केले असू शकते, असा आरोप श्याम मिश्रा यांनी केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPoliceपोलिसArrestअटक