- डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा जगातील पहिला ‘रोबो वकील’ अमेरिकेत पक्षकारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी सज्ज झाला आहे. याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट न्यायदान कक्षात प्रवेश होणार आहे.
अमेरिकेतील डू नॉट पे या स्टार्टअपने जगातील पहिला यंत्रमानव वकील तयार केल्याचा दावा केला आहे. पुढील महिन्यात जेव्हा वेगमर्यादेच्या उल्लंघनाच्या दोन प्रकरणांची सुनावणी न्यायालय करेल तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेसह समर्थित रोबो प्रतिवादींना सूचना देईल.
किती रुपये मोजले?
स्टार्टअप कंपनीने कोणत्याही वकिलाने न्यायालयात एअरपॉड घालून, त्यांचा रोबो वकिलाला जे सांगेल नेमके तेच शब्द उच्चारत आपली बाजू मांडण्यास १० लाख डॉलर्स देऊ केले आहेत. आमच्याकडे वाहतूक न्यायालयातील खटले आहेत. आमचा द्वेष करणारे म्हणतील जीपीटीसाठी हे खूप सोपे आहे. म्हणून आम्ही ही गंभीर ऑफर देत आहोत, असे स्टार्टअपच्या सीईओने म्हटले.
कशी देणार सूचना?
- यासाठी प्रतिवादी ब्लूटूथसह एअरपॉडसारखे श्रवणयंत्र कानात घालेल.
- रोबो कामकाज ऐकेल आणि नंतर प्रतिवादींच्या कानात कुजबुजून आपली बाजू मांडताना काय बोलायचे याबाबत सूचना देईल.
- न्यायालयाचे ठिकाण किंवा प्रतिवादीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.
काय आहे दावा?
- जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. हे माणसांप्रमाणे मजकूर आणि भाषांतर निर्माण करण्यास सक्षम असते.
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी न्यायालय हे उत्कृष्ट ठिकाण आहे, असा दावाही या सीईओ यांनी केला आहे.