हरियाणातील झज्जरच्या बहादूरगडमध्ये धुरामुळे गुदमरून ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खूप थंडी लागत असल्याने तिघांनी छोट्या लाकडांची शेकोटी घरात पेटवली होती. मात्र मोकळी हवा न मिळाल्याने खोलीत गॅस तयार होऊन तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोघं उत्तराखंड आणि एकजण पश्चिम बंगालचा आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
तिघेही एकाच कंपनीत होते-
हे तिघेही एचएसआयडीसी सेक्टर १६, बहादूरगड येथील योकोहामा टायर कंपनीत काम करत होते. मंगळवारी सकाळी तिघंही नेहमीप्रमाणे कामावर न आल्याने कंपनीचे प्रकल्प प्रमुख विकास यांनी त्यांना अनेक फोन केले, मात्र त्यांनी एकही फोन आला नाही. त्यानंतर विकास रुमवर पोहोचले. मात्र दरवाज खूप ठोठावल्यानंतरही उघडला नाही तेव्हा त्यांनी खिडकीतून पाहिले असता तिघंही बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले.
गुदमरून मृत्यू
सदर घटनेची माहिती विकासने तात्काळ सेक्टर-६ पोलीस ठाण्याव्यतिरिक्त त्याच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला. त्यावेळी तिघांच्याही तोंडातून अन्न बाहेर पडले होते. तसेच शेजारी आगीची राख पडलेली आहे.खोलीत खेळती हवा नसल्यामुळे गॅस तयार होऊन तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. थंडीपासून वाचण्यासाठी खोलीतच छोटी लाकडं पेटवली होती. रात्री ते सर्व झोपी गेले. त्यामुळे गुदमरून तिघांचाही मृत्यू झाला. सकाळी तिघांचेही मृतदेह खोलीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
हरियाणात हाडांना गारवा देणारी थंडी
हरियाणामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडी आहे. काही ठिकाणी पारा १ अंशावर पोहोचला आहे. थंडीच्या लाटेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोमवारी संपूर्ण राज्यात थंडीची लाट दिसून आली. थंडीपासून वाचण्यासाठी स्थलांतरित मजुरांनीही शेकोटीचा सहारा घेतला आणि हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले.
फॉरेन्सिक टीम तपासात गुंतली-
स्टेशन प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे प्रकरण गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे दिसते. मात्र पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. एवढेच नाही तर फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बहादुरगड सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"