शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

१० महिन्यांपूर्वी लग्न अन्...! पती आवडत नसल्यानं पत्नीनं रचला कट? २४ वर्षीय तरूणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 2:44 PM

पती आवडत नसल्याच्या रागात पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पती आवडत नसल्याच्या रागात पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ माजली. गरौल पोलीस स्टेशन जवळील रेल्वे रूळावर एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळताच परिसरात खळबळ उडाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्यापासून काही अंतरावर या तरुणाची दुचाकी रेल्वे रूळाच्या बाजूला उभी होती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. राजवीर कुमार (२४) असे या मृत तरुणाचे नाव असून तो मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहे.   माहितीनुसार, मृत तरूण त्याच्या सासरी अर्थात गरौलला गेला होता. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. मृत राजवीर कुमारचा विवाह २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जवळील बहादूरपूर गावातील रहिवासी जालंधर सिंह यांची मुलगी निशा कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीत भांडण सुरू झाले. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, निशा कुमारीला राजवीर आवडत नव्हता. निशा आणि राजकुमार यांच्यात नेहमी वाद व्हायचा. लक्षणीय बाब म्हणजे सासरच्या मंडळीकडून निशाचा छळ होत होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. १० महिन्यांपूर्वी लग्न अन्... मृत राजवीरचे मामा पवन कुमार यांनी सांगितले की, निशा कुमारीला तिच्या पतीसोबत (राजवीर) राहायचे नव्हते. त्यामुळे तिने तिच्या माहेरच्यांसह कट रचून त्याची हत्या केली. पत्नीच्या सांगण्यावरूनच राजवीर त्याच्या सासरी गेला होता. तसेच पोलिसांनी तरुणाच्या हत्येच्या आरोपावरून राजवीरचे सासरे, सासू आणि पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. मृताच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार