शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:53 AM

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.

नवी दिल्ली : अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणे, हा मुख्य उद्देश असलेले रामजन्मभूमी आंदोलन त्यानंतर बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या घातक आक्रमणाचा सामना करत धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक बनले, असे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.

या आंदोलनाला समाजाच्या तळागाळातून मोठा पाठिंबा मिळत होता. दुसऱ्या बाजूला विशिष्ट समुदायाची मते आपल्याला मिळणार नाहीत, या भीतीमुळे बहुतांश राजकीय पक्ष राम जन्मभूमी आंदोलनाचे समर्थन करण्यास कचरत होते. मतपेढीच्या राजकारणाला शरण जाऊन या पक्षांनी वर्तनाचे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समर्थन सुरू केले.

१९९०मध्ये सोमनाथ ते अयोध्येपर्यंत लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा काढण्यात आली होती. रथयात्रा काढून आंदाेलनाला राजकीय मुद्दा बनविले. या आंदाेलनमुळे भाजपची ताकत वाढली. अडवाणी हे सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. त्यावेळी सर्व घटनांचा संदर्भ देऊन लालकृष्ण अडवाणी (वय ९६) यांनी सांगितले की, रथयात्रेच्या रुपाने नियतीनेच कर्तव्य पार पाडण्याची मला संधी दिली हाेती. 

अटलजी, पत्नी कमला यांची आठवणलालकृष्ण अडवाणी म्हणाले की, अयोध्येत राम जन्मभूमीवर राममंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, भाजप तसेच रामरथयात्रेत सहभागी झालेले हजारो लोक, संतमहंत, कारसेवक, नेते यांचा मी आभारी आहे. मात्र, अयोध्येत राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मला पत्नी कमला व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण येते. ते आज हे पाहण्यासाठी हवे होते.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या