नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे येथील बनावट नोटा प्रकरणी एका दहशतवाद्यासह चार जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. मुंबईतील विशेष न्यायालयात बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कुख्यात दहशतवादी -अंकल उर्फ ‘जावेद पटेल’ उर्फ ‘जावेद चिकना’ याच्याव्यतिरिक्त, आरोपपत्रात रियाझ शिकिलकर, मोहम्मद फैयाज शिकिलकर आणि नासिर चौधरी यांची नावे आहेत. हे चौघेही मुंबईचे रहिवासी असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फैयाजवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये रियाझ शिकीलकर यांच्याकडून २,००० रुपयांच्या १४९ बनावट भारतीय नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे.