अनकापल्ली : अवजड वाहने मालाची वाहतूक करत असताना अनेकवेळा अति लोडमुळे अपघात होत असतात. अपघात झाल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक मदतीसाठी पुढे येतात. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक वाहन रस्ते अपघताता पलटी झाले. पण गाडी पलटताच लोकांनी त्या दिशेने धाव घेतली पण मदतीचा हात पुढे करण्यासाठी नव्हे, तर त्यात ठेवलेला माल चोरण्यासाठी. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असेलला व्हिडीओ आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील आहे. इथे मंगळवारी २०० बिअरचे बॉक्स घेऊन जाणारी गाडी भररस्त्यात पलटली अन् एकच गोंधळ उडाला. गाडीत असलेल्या चालकाला मदत करायची सोडून बघ्यांनी बिअरच्या बाटला चोरण्यासाठी धाव घेतली. बघता-बघता कित्येक बिअरचे बॉक्स घटनास्थळावरून गायब झाल्याचे दिसते.
बिअर घेऊन लोकांनी काढला पळव्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाडी पलटी होताच बिअरच्या बाटला नेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडते. खरं तर अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी बिअरच्या बाटला चोरण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र, कोणीच संबंधित चालकाची विचारपूसही केली नाही याउलट बिअरचे बॉक्स घेऊन पळ काढला. काही लोक बॉक्स घेऊन रस्त्यावरून धावत आहेत तर काहींनी मोटारसायकलवरून बिअरचे बॉक्स लंपास केले.
या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. "ही संस्कृती मस्त आहे", असं काही नेटकरी गमतीशीरपणे म्हणत आहेत.