गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता प्रारंभ केला आहे. राज्यासह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक प्रेमी युगुल नृत्य करून पावसाचे आगमन करत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूर येथील असल्याचे बोलले जात आहे.
या व्हिडीओमध्ये एक कपल पावसात रस्त्यावर नाचत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेकजण पसंती देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंदूरच्या भंवर कुआन भागातील आहे. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या इंदूरच्या या भागात मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारे कपल यापैकीच एका कॉलेज किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असल्याचे समजते.
मध्य प्रदेशमधील हवामानाचा अंदाजभारतीय हवामानशास्त्र विभागाच्या भोपाळ केंद्राने रविवारी सागर, नर्मदापुरम, शहडोल, रेवा, भोपाळ, उज्जैन, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर आणि चंबळ विभागात अनेक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.