शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

VIDEO: ना ब्रश ना हातमोजे, भाजपा खासदाराने हातानेच साफ केले शाळेतील शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 4:03 PM

भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी हाताने शाळेतील शौचालय साफ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्याचे खासदार जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. नेहमी वादामुळे चर्चेत असणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते हाताने शाळेतील शौचालय साफ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार महोदय रीवा जिल्ह्यातील बालिका विद्यालय खटखरी येथे गेले होते. खरं तर हातात ब्रश न घेता आणि हातमोजे देखील न घालता त्यांनी हातांनीच शौचालय साफ केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून ते गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत बीजेपी सेवा मोहिम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवरजनार्दन मिश्रा यांनी बालिका विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता. 

शाळेत फेरफटका मारल्यानंतर शाळेतील शौचालय खराब असल्याचे मिश्रा यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्यांनी हातानेच शौचालय साफ करण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे कोणताही ब्रश अथवा हातमोजे न घेता मिश्रा यांनी हातानेच शौचालय साफ केले. तसेच हाताने शौचालय साफ करून स्वच्छता राखण्याचा त्यांनी संदेश दिला आहे. 

वादग्रस्त वक्त्व्यांमुळे चर्चेत जनार्दन मिश्रा यांनी यावेळी म्हटले, "सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते नरेंद्र मोदी स्वच्छतेचा संदेश देत आहेत. याच काहीच नवीन नाही मी यापूर्वी देखील शौचालय साफ केले आहे." याआधी मिश्रा यांनी रिक्शा चालवून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला होता, तेव्हाही त्यांची खूप चर्चा रंगली होती. ते अनेकवेळा वादग्रस्त वक्त्व्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. कचरा वाढवणाऱ्यांना फासावर चढवा, अशा काही विधानांमुळे ते चर्चेत राहिले होते.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाMember of parliamentखासदारSchoolशाळा