शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

अनेक ऐतिहासिक क्षणांची ठरली साक्षीदार; जुन्या संसदेतील ठळक आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 7:51 AM

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली.

नवी दिल्ली - संसदेचे कामकाज आता नव्या इमारतीतून हाेणार आहे. १९२७ मध्ये संसद भवनाचे उद्घाटन झाले हाेते. जुनी इमारत ९० वर्षांपेक्षा जास्त वयाची झाली असली तरी याच इमारतीने देशाच्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पाहिली आहेत. या कालावधीत अनेक ऐतिहासिक घटनांची ही इमारत साक्षीदार ठरली आहे. त्यापैकी काही माेजक्या घटना जाणून घेऊ या....

देश स्वतंत्र झाला त्यावेळी १५ ऑगस्ट १९४७ राेजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पहिले ऐतिहासिक भाषण केले हाेते. विसाव्या शतकातील महान भाषणांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख हाेताे.

भारताची राज्यघटना २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संसदेमध्ये स्वीकारण्यात आली. त्यानंतर २६ जानेवारी १९५०पासून ती लागू झाली. हा महत्त्वाचा क्षण जुन्या भवनातील एक अजरामर क्षण आहे.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ राेजी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी संसदेत १४ फेब्रुवारी १९६६ राेजी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पंतप्रधान म्हणून प्रथमच पाऊल ठेवले.

माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन अर्थमंत्री मनमाेहन सिंग यांनी २४ जुलै १९९१ राेजी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकरणारा अर्थसंकल्प सादर केला. जगासाठी भारताचे दरवाजे त्यामुळे खुले झाले. जागतिकीकरणात भारताचे ते पहिले पाऊल हाेते.भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची सर्वप्रथम १९९६मध्ये शपथ घेतली. हे सरकार केवळ १३ दिवस टिकले. बहुमत सिद्ध करताना त्यांनी केलेले भाषण संस्मरणीय ठरले.

माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्या सरकारविराेधात डाव्या पक्षांनी अमेरिकेसाेबतच्या ऐतिहासिक अणुकरारावरून अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. २२ जुलै २००८ राेजी या प्रस्तावाला मनमाेहन सरकार सामाेरे गेले आणि जिंकले हाेते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेत सर्वप्रथम प्रवेश करताना पायऱ्यांवर डाेके टेकवून लाेकशाहीच्या मंदिरासमाेर नमस्कार केला.ऑगस्ट २०१६मध्ये संसदेत महत्त्वपूर्ण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर झाले. देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल हाेते.

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यात आले. संसदेत ५ ऑगस्ट २०१९ राेजी हा ऐतिहासिक ठराव मंजूर झाला.

टॅग्स :Parliamentसंसद