शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

RBI च्या सल्ल्याकडे दुर्लक्ष! मेसेज आला अन् लिंक ओपन करताच अकाउंट झालं खाली; एक लाखाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 3:47 PM

Banking Fraud: मेसेज आणि ईमेलद्वारे बँकिंग फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतात.

नवी दिल्ली : मेसेज आणि ईमेलद्वारे बँकिंग फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. अनेक प्रकारे समज देऊनही लोक सायबर गुन्हेगारांच्या तावडीत अडकत असल्याच्या घटना वारंवार घडतात. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला ज्यामध्ये लिंकवर जाऊन आवश्यक माहिती मागवण्यात आली. असे करून या महिलेच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले.

एक लाखाची फसवणूकवृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या DLF फेज-5 मध्ये राहणारी माधवी दत्ता ही महिला सायबर गुन्हेगारांची शिकार झाली आहे. मात्र, देशातील ही पहिलीच घटना नसून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक करतात. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पीडित माधवी दत्ता या महिलेच्या मोबाईलवर 21 जानेवारी रोजी एक मेसेज आला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "प्रिय युजर, तुमचे एचडीएफसी खाते आज बंद केले जाईल, येथे क्लिक करा आणि तुमचा पॅन कार्ड नंबर मोबाईल क्रमांकाशी लिंक करा."

महिलेने सांगितली आपबीती पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत माधवी दत्ता यांनी म्हटले, त्यांनी लिंकवर क्लिक केले, जी त्यांना एका वेबपेजवर घेऊन गेली. तिथे तपशील देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी आला. त्यांनी ओटीपी टाकताच खात्यातून एक लाख रुपये उकळले गेले. सायबर हेल्पलाइन 1930 वर अनेक वेळा कॉल केला पण संपर्क होऊ शकला नाही आणि शेवटी सायबर पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीनंतर, सायबर क्राईम  पूर्व पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 419 आणि 420 (फसवणूक) अंतर्गत अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Haryanaहरयाणाcyber crimeसायबर क्राइमbankबँकhdfc bankएचडीएफसीPoliceपोलिस