धक्कादायक! 'प्रधानमंत्री आवास' देतो म्हणून सरपंचाने महिलेला नेलं जंगलात अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:16 PM2022-12-14T13:16:14+5:302022-12-14T13:18:05+5:30
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका सरपंचावर विवाहित महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका सरपंचावर विवाहित महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री आवास देतो असे सांगून सरपंचाने तिला बोलावले आणि जंगलात नेऊन बलात्कार केला. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
माहितीनुसार, ग्वालियरच्या लुटपुरा भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सरपंचाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिची मुरैना जिल्ह्यातील शनिचरा गावचे सरपंच जंडेल सिंग गुर्जर यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात महिलेचे आरोपी सरपंचाशी फोनवरून संभाषण झाले. यानंतर सरपंचाने संबंधित महिलेला फोन करून बोलावले आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे सांगून गाडीत बसवले.
महिलेचा गंभीर आरोप
महिलेचे म्हणणे आहे की, आरोपी तिला साताऊ येथील जंगलात घेऊन गेला. येथे त्याने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो जंगलात सोडून पळून गेला. घटनेनंतर पीडित महिला रस्त्यावर पोहोचली. ये-जा करणाऱ्यांच्या मदतीने ती ग्वालियरला आली. येथे तिने घरच्यांना संपूर्ण घटना सांगितली.
अपहरणाचा गुन्हा दाखल
यानंतर पीडित महिला कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. ही घटना आंतर पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी महिलेला आंतरी पोलिसांत तक्रार करण्यासाठी पाठवले. पोलिसांनी पीडित महिलेच्या आरोपावरून सरपंच जंडेल सिंग गुर्जरविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"