शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

नवविवाहितेचा कट! पार्लरमध्ये जाते सांगितलं, प्रियकराला बोलावलं पण पतीला सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 6:58 PM

लग्नाच्या २५ व्या दिवशी नवविवाहिता पतीला सोडून प्रियकरासह पळून जात होती.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इथं नवविवाहित महिलेनं लग्न होऊन १ महिना न होताच जे केलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला. लग्नाच्या २५ व्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, वाटेत पतीनं तिला गाठलं अन् हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती. अशातच तिनं पार्लरला जाते असं सांगून तिथून पळ काढला. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तितक्यात पतीनं तिला दुसऱ्याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला. मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले. 

दरम्यान, आपल्या पत्नीला अनोळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला. त्यानं आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला, तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. नवविवाहितेच्या पतीनं सांगितलं की, त्याचा विवाह ११ मार्च २०२४ रोजी झाला होता. पत्नीनं त्याला दमदाटी करून आपल्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता. 

आत्महत्येची दिली धमकी पत्नीच्या आग्रहास्तव पती तिला घेऊन त्याच्या सासरच्या घरी निघाला होता. मात्र, पत्नीनं प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला होता. नवविवाहित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, माझ्या विरोधाला न जुमानता कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीनं माझं लग्न लावून दिलं. मला आजही माझ्या प्रियकरासोबत राहायचं आहे. यानंतरही जबरदस्ती झाली तर मी आत्महत्या करून जीवन संपवेन. पण, मी माझ्या पतीसोबत राहणार नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार