गाझियाबाद : फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. हा महिना जगभरातील जोडप्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हॅलेंटाईन म्हणजेच प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारीला सर्वत्र साजरा केला जातो. पण या दिवसाच्या आधी प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी आठवडाभर विविध दिवस साजरे केले जातात. जगभरातील कपल्स आपल्या जोडीदाराला विविध भेटवस्तू देऊन हा महिना अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझिबाद येथील तरूणाने आपल्या प्रेयसीला एक अनोखी भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. इथे प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या नावाने चक्क गुलाब गार्डन तयार केले असून त्याला 'श्रिया गुलाब उपवन' असे नाव दिले आहे.
श्रिया गुलाब गार्डनची कहाणी ज्या क्षेत्रात ही गुलाबाची बाग बनवली आहे त्याची देखरेख पर्यावरणप्रेमी प्रदीप धालिया हा तरूण करतो. प्रदीपने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, एकदा एक मुलगा त्याच्याकडे आला, त्याने त्याच्या प्रेयसीच्या नावाने पर्यावरणासाठी संदेश देण्याची कल्पना सुचवली. प्रदीपला ही कल्पना आवडली मग त्याने मिळून ही गुलाबाची बाग तयार केली ज्याला एकूण 8 महिने लागले.
सर्वत्र होतंय कौतुक प्रदीप आपल्या शेतातील रोपटे लोकांना वृक्षारोपणासाठी मोफत देतो. या बागेत लावलेले सुंदर गुलाब सर्वांना आकर्षित करतात. मात्र, प्रदीपला प्रेयसीने आपली ओळख गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. प्रेयसीला अनोखी भेट देणारी ही कहाणी अनेकांना आकर्षित करत आहे. प्रदीपने सांगितले की, त्याची प्रेयसी त्याला नेहमी सांगते की जेव्हा जेव्हा लोक ही बाग पाहतील किंवा येथून गुलाब तोडतील तसतसे आपले प्रेम आणखी बहरत जाईल. प्रेमवेड्या तरूणाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याने यामाध्यमातून पर्यावरणाचे सरंक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"