शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

२ वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन; सासऱ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 3:54 PM

पोलिसांनी मृत केशवची पत्नी कंचनला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

पती पत्नीच्या वादानंतर पतीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडली. मृत व्यक्तीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढलळा अन् एकच खळबळ माजली. स्थानिकांकडून माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत केशवची हत्या त्याची पत्नी कंचनने केली असून मृतदेह पंख्याला लटकवला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी मृत केशवची पत्नी कंचनला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

फुलकहा गावातील रहिवासी असलेला केशव नोकरी सुटल्याने गावी लहान मुलांचे क्लासेस घ्यायचा. त्याचे वडील रमाशंकर सिंग हे देखील निवृत्त झाल्यानंतर गावातच वास्तव्यास आहेत. केशवचे दोन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील कंचनशी प्रेम विवाह झाला होता. कंचनने सांगितले की, दीड वर्षांपूर्वी केशवने तिच्याशी विवाह केला. पण सध्या तो कोणतेच काम करत नव्हता. यावरून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. मग ती जवळच्या गावातील एका नातेवाईकाकडे गेली. रात्री केशवने फोन केला असता घरी परत न आल्यास आत्महत्या करेन अशी केशवने धमकी दिली. कंचननं घरी जाणं टाळलं अन् सकाळी मृत्यूची बातमी समोर आली. 

कुटुंबीयांचे गंभीर आरोप मृत केशवचे वडील रामा शंकर सिंग यांनी कंचनवर गंभीर आरोप केले. कंचननेच केशवची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आमचा त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते दोघे भाड्याने खोली घेऊन राहत होते. लग्नाच्या काही दिवसानंतर केशव आणि कंचन यांच्यात वाद होऊ लागला. यामुळे केशव तणावात असायचा. दरम्यान, केशव नोकरी करत असताना त्याची ओळख मोतिहारी येथील कंचनशी झाली. हळू हळू दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. विरोधामुळे केशव आणि कंचन यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि भाड्याच्या खोलीत राहू लागले. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट