ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. या निवडणुकीत हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या युवा नेत्या शिवानी राजा ह्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आता ब्रिटनच्या संसदेमध्ये त्यांनी असं काही केलं की ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. भारतीय वंशाच्या गुजराती व्यावसायिक असलेल्या शिवानी राजा यांनी संसदेमध्ये भगवत गीता हातात घेऊन शपथ घेतली.
ब्रिटनमधील निवडणुकीत हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला असला तरी शिवानी राजा यांनी पक्षासाठी एका ऐतिहासिक विजय मिळवला होता. शिवानी यांनी लिसेस्टर ईस्ट मतदारसंघातील मजूर पक्षाच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. जवळपास ३७ वर्षांनंतर हुजूर पक्षाने येथे विजय मिळवला. शिवानी राव यांनी लिसेस्टर ईस्ट मतदारसंघामध्ये लेबर पक्षाचे उमेदवार राजेश अग्रवाल यांचा पराभवव केला होता.
दरम्यान, ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदार म्हणून शपथ घेतल्यावर शिवानी अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, लिसेस्टर ईस्टचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणं माझ्यासाठी सन्माननीय आहे. गीतेवर हात ठेवून महामहीम राजे चार्ल्स यांच्या प्रति आपल्या निष्ठेची शपथ घेणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे..
शिवानी राजा यांना लिसेस्टर ईस्ट मतदारसंघात मिळालेला विजय हा लिसेस्टर सिटीचा मागच्या काही काळातील इतिहास पाहता उल्लेखनीय आहे. २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० आशिया चषक सामन्यानंतर हिंदू समाज आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला होता. या निवडणुकीत शिवानी राज यांना १४ हजार ५२६ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी महापौर राजेश अग्रवाल यांना १० हजार १०० मतं मिळाली. शिवानी राजा यांचा विजय महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे १९८७ पासून लिसेस्टर ईस्ट या मतदारसंघावर मजूर पक्षाचं वर्चस्व राहिलं होतं.