आजकाल बँकांमध्ये देखील आपला पैसा सुरक्षित राहिलेला नाहीय. एकतर कोणतरी घपला करतो, किंवा हॅकर काढून घेतोय. असे असताना आता बँकेच्या लॉकरमध्ये देखील ठेवलेले पैसे सुरक्षित राहतील याची खात्री नसणारा प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील पीएनबी बँकेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या नोटांना वाळवीने खाऊन टाकले होते. जेव्हा ही ग्राहक तरुणी लॉकर खोलायला आली तेव्हा मातीचा गोळा पाहून किंचाळलीच. यानंतर बँकेचा मॅनजरही ते पाहून हादरला. लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये वाळवीने फस्त करून टाकले होते.
सुनीता मेहता यांचे व त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले होते. मे मध्ये त्यांनी हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. आता गरज पडली तेव्हा ते त्या काढण्यासाठी गेल्या. परंतू लॉकर खोलताच मातीसारखी वस्तू दिसल्याने त्या हादरल्या. बँक मॅनेजमेंटने पेस्ट कंट्रोल केले नाही यामुळे नोटांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मेहता यांच्या भावाने सांगितले की, आम्ही दोघेही लॉकरमधील वस्तू नेण्यासाठी गेलो होतो. पहिले मी माझे लॉकर खोलले. जेव्हा ताईने तिचे लॉकर खोलले तेव्हा ती किंचालली. बंडलांच्या जागी वाळवी लागली होती. यामुळे बंडले अडकली होती. बँक कर्मचाऱ्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने बंडले बाहेर काढली. १५ हजाराचे ५० रुपयांचे एक बंड पूर्णपणे कुरतडले गेले होते. दुसरे बाहेरून ठीक दिसत होते. त्या ५०० च्या नोटा होत्या. यामुळे बँक मॅनेजरने आम्हाला १५ हजाराच्या नोटा बदलून दिल्या. ते सर्व पैसे घेऊन आम्ही घरी गेलो तर उरलेल्या २ लाखांच्या नोटा देखील वाळवीने खाल्लेल्या दिसल्या.
या नोटा घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही परत बँकेत गेलो. तेव्हा बँक मॅनेजरने त्या बदलून देण्यास नकार दिला. मात्र, आम्ही तिथे आरडाओरडा करताच त्याने त्या देखील बदलून दिल्या आहेत, असे मेहतांचा भाऊ म्हणाला.
त्या बँकेत असे किमान 25 लॉकर असतील ज्यांना वाळवी लागलेली असेल. बँक कर्मचाऱ्यांनी वेळीच यावर तोडगा काढला असता, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंपर्यंत वाळवी पोहोचली नसती. लोकांचे नुकसान झाले नसते, असे मेहता म्हणाल्या. आता बँक प्रशासनाने ज्यांची ज्यांची लॉकर आहेत त्यांना फोन करून लॉकर चेक करण्यास सांगितले आहे.