नवी दिल्ली : आधार कार्ड संदर्भात महत्वाची बातमी आहे. आता यूआयडीएआय (UIDAI) आपल्या युजर्ससाठी नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, यूआयडीएआय अशी योजना बनवत आहे, ज्यामुळेमुलाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. म्हणजेच आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड तयार करण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही.
यूआयडीएआय यासाठी एक नवीन योजना तयार करत आहे. आता जन्मलेल्या बालकांना आधार कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना दिली जाणार आहे. ही योजना सुरू करण्यासाठी यूआयडीएआय, बर्थ रजिस्ट्रारसोबत मिळून काम करेल आणि त्यासाठी चर्चा सुद्धा सुरू आहेत, असे सौरभ गर्ग यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी आधार कार्डशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी यूआयडीएआयच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात दररोज जवळपास 2.5 कोटी मुले जन्माला येतात. अशा परिस्थितीत यूआयडीएआयची योजना आहे की रुग्णालयात जन्मलेल्या मुलांचे फोटो काढल्यानंतर एकाच वेळी आधार कार्ड जारी केले जाईल. दरम्यान, सध्या 5 वर्षांखालील मुलांच्या आधारासाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण जेव्हा त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य होते.
याचबरोबर, 'आता लवकरच भारतात प्रादेशिक भाषांमध्येही आधार कार्ड जारी केले जातील', असे सौरभ गर्ग यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात आधार कार्डवर फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती दिली जाते. पण लवकरच आधार कार्डावर कार्डधारकाचे नाव आणि इतर माहिती पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये दिसेल.
आधार कार्ड अनिवार्यविशेष म्हणजे, आधार कार्ड हे भारतातील एक आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. याशिवाय, आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी लाभांसाठी अनिवार्य दस्तावेज आहे. आमचे आधार कार्ड एक युनिक डॉक्युमेंट आहे, कारण त्यात आवश्यक माहिती असते. आता तर आधार हे मुलांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे.