आधार कार्ड (Aadhaar Card) जर तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला पुरावा हा द्यावाच लागणार आहे. यापुढे अॅड्रेस प्रूफशिवाय तुम्हाला पत्ता बदलता येणार नाही. UIDAI ने ट्विटरवरून एका युजरच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. (Aadhaar card update: Big change in address proof verification process -Know details)
प्रिय, रहिवासी, रहिवासी पत्ता सांगणारे अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर सुविधा पुढील सूचना येईस्तोवर बंद करण्यात आले आहे. कृपया अन्य कोणत्याही अधिकृत पुराव्याचा वापर करून तुमचा पत्ता अपडेट करावा, असे युआयडीएआयने (UIDAI) म्हटले आहे.
ज्या लोकांच्या नावावर घर नाही, जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासह लाखो लोकांसाठी विना अॅड्रेस प्रूफ त्यांचा पत्ता अपडेट करण्याची सुविधा देऊ केली होती. याचा फायदा भाडेकरू, एकत्र कुटुंबात राहणारे आदी लोकांना होत होता. ही सुविधा पुढील आदेश येईस्तोवर बंद केली आहे.
आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी ऑलाईन किंवा ऑफलाईन पर्याय आहे. यासाठी अॅड्रेस प्रूफ म्हणून 45 डॉक्युमेंट लागतील. यामध्ये पासपोर्ट, रेशन कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक, लाईट बिल, पाण्याचे बिल, टेलिफोन बिल, इन्शुरन्स पॉलिसी, सरकारी फोटो आयडी, पेन्शन कार्ड, किसान पासबूक, मनरेगा कार्ड आदी कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा...
Aadhaar Card update: सध्या आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झआलं आहे. याच्याशिवाय बऱ्याचशा कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. बँक, रेशन, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन इतकंच काय तर लसीकरणासाठीही आधार क्रमांकाचा वापर केला जातो. परंतु अन्य कोणती व्यक्ती तुमच्या या आधार क्रमांकाचा गैरवापर तर करत नाहीये ना हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या आधार कार्डावर सिमकार्ड किंवा अन्य कोणत्या योजनांचा वापर केला जातोय का हेदेखील आता तुम्ही माहित करून घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्डाशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्हाला https://resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये असलेल्या आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या 'Generate OTP' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. UIDAI वेबसाईटवर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर असणं आवश्यक आहे. ओटीपी एन्टर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. दरम्यान, त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशनची तारीख, वेळ आणि प्रकार समजेल. परंतु त्यासाठी कोणी अर्ज केला आहे याची माहिती मिळणार नाही.