नवी दिल्ली- आधार कार्ड प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. ‘आधार’शिवाय कुठलंही काम अपूर्ण आहे. मग ते इन्कम टॅक्स असो वा कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल. किंवा कोरोना लस घ्यायची असेल तर आधार कार्ड आवश्यक आहे. बँकेत सर्वाधिक कामं, घर खरेदी करण्यापासून मुलाच्या जन्म दाखल्यापर्यंत सर्वठिकाणी आधार कार्डची गरज भासते.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर Aadhaar Card चं काय होणार?
परंतु आपण याठिकाणी आधार कार्डनं मिळणाऱ्या सुविधेबद्दल बोलणार नाही, तर आधार कार्डचं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं? या प्रश्नाबाबत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत उत्तर दिले. त्यांनी म्हटलं की, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड डिएक्टिव्ह होत नाही, कारण अशाप्रकारे कुठलीही तरतूद नाही.
आधार कार्ड रद्द करण्याची व्यवस्था नाही - सरकार
चंद्रशेखर यांनी सांगितले की, सध्या कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड नंबर रद्द करण्याची व्यवस्था नाही. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मध्ये संशोधन करून UIDAI ने सूचना मागवल्या होत्या. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र जारी करताना मृत व्यक्तीचं आधार कार्ड घेऊ शकतो.
आधार कार्ड मृत्यू प्रमाणपत्राशी जोडणार?
सध्या जन्म आणि मृत्यू रजिस्ट्रार आकडेनुसार कस्टोडियन संरक्षण आहे. आधार डिएक्टिवेट करण्यासाठी मृत व्यक्तीचं आधार कार्ड घेण्याबाबत कुठलीही तरतूद नाही. परंतु पुन्हा एकदा या संस्थांना आधार कार्ड नंबर शेअर फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर रजिस्ट्रार मृत व्यक्तीचे आधार कार्ड डिएक्टिव्ह करू शकतात. आधार डिएक्टिव्ह करणे अथवा डेथ सर्टिफिकेट लिंक केल्यानं आधार कार्डचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर चुकीचा वापर होऊ शकत नाही.
मागील महिन्यात UIDAI ने त्यांच्या घरीच पोस्टमॅनच्या माध्यमातून आधार कार्डचं मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि UIDAI ने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मोबाईल नंबर अपडेट करण्याची व्यवस्था दिली आहे. त्यामुळे भविष्यात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड डिएक्टिव्ह करण्यासाठी सुविधा दिली जाईल अशी माहिती केंद्राने दिली आहे.